Tuesday, February 27, 2024

लेक लाडकी योजनेकरिता अर्ज सुरू

 Parbhani

लेक लाडकी योजनेकरिता अर्ज करण्याचे आवाहन


 परभणी, दि. 27 फेब्रुवारी 2024 : बालविकास प्रकल्प

 अधिकारी नागरी प्रकल्प परभणी या कार्यालयामार्फत 'लेक

 लाडकी ही योजना' राबविली जात आहे. दि. 1 एप्रिल 2023

 नंतर जन्मलेल्या मुलींच्या सक्षमीकरणासाठी टप्प्या-टप्प्याने

 तिला रुपये 1 लाख 1 हजार एवढी रक्कम देण्यात येत आहे.


  महिला व बालविकास विभागामार्फत 'लेक लाडकी' ही

 नवीन योजना सुरु करण्यात आली असून मुलीच्या जन्मास

 प्रोत्साहन देवून मुलींच्या जन्मदर वाढविणे, मुलीच्या

 शिक्षणास चालना देणे, मुलीचा मत्यु दर कमी करणे,

 बालविवाह रोखणे, कुपोषण कमी करणे, शाळा बाह्य मुलींचे

 प्रमाण शुन्यावर आणण्यासाठी प्रोत्साहीत करणे हे या

 योजनेचे प्रमुख उद्दिष्ट आहेत.


जिल्ह्यायातील महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत

 क्षेत्रातील 1 एप्रिल, 2023 नंतर जन्मलेल्या मुलींच्या

 पालकांनी विहीत नमुन्यात अर्ज नजीकच्या अंगणवाडी

 केंद्रात सादर करावे असे आवाहन बालविकास प्रकल्प

 अधिकारी (नागरी प्रकल्प) मिलिंद वाघमारे यांनी केले आहे.


🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹



Monday, February 26, 2024

Sunday, February 25, 2024

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभिप्राय दिवस


 उपक्रमाचे नाव- largest-online-photo-album-of-handwritten-notes-in-24-hours

    महाराष्ट्र राज्यामध्ये "मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा" या उपक्रमातंर्गत शासकीय व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला आहे.


मा.मुख्यमंत्री महोदय यांनी विदयार्थ्यांना उद्देशून लिहिलेले संदेश पत्र हे सर्व शाळांमधील २ कोटी ११ लाख मुलांपर्यंत पोहचविण्यात आलेले आहे. 


                  वरील लिंकवर क्लिक करून दि.17/02/2024 ते दि.25/02/2024 या कालावधीमध्ये घोषवाक्य व सेल्फीचा फोटो अपलोड केलेला आहे. आता त्याच लिंकवर क्लिक करून दि.26/02/2024 रोजी सकाळी 9.00 पासून दि. 27/02/2024 रोजी सकाळी 8.59 पर्यंत विद्यार्थ्यांच्या अभिप्रायाचा फोटो अपलोड करायचा आहे.

*कार्यपध्दती :*

✍️ पालकांनी मा. मुख्यमंत्री महोदय यांचे पत्र मुलांना सोबत घेऊन वाचावयाचे आहे.

✍️ हे पत्र वाचून झाल्यावर त्यांनी छोट्या वहीचे एक पान व एक बॉलपेन घ्यायचे आहे.

✍️ या पानावर मुलांनी बॉलपेनाने स्वतःच्या हस्ताक्षरात या पत्राविषयी त्यांचा शिक्षण विषयक अभिप्राय नमूद करणे अपेक्षित आहे. लहान वयोगटातील विद्यार्थ्यांना लेखन शक्य नसल्यास त्यांच्या पालकांच्या हस्ताक्षरात लेखन करता येईल. ज्या पालकांना लेखन करता येत नाही त्यांच्या वतीने अन्य व्यक्तींकडून लेखन करुन घेता येईल.

✍️हा अभिप्राय ५ ते ६ ओळीमध्ये असावा.

✍️अभिप्राय लिहून झाल्यावर पालकांनी अभिप्राय लिहिलेल्या पानाचा फोटो आपल्या मोबाईलच्या कॅमे-यात
काढायचा आहे.

✍️ त्यानंतर शिक्षण विभागाच्या www.mahacmletter.in वेबसाईटवर जाऊन स्वतःच्या नावाने रजिस्ट्रेशन करणे अपेक्षित आहे.

✍️त्यानंतर हस्ताक्षरातला अभिप्रायाचा फोटो अपलोड करावयाचा आहे.


फ्लो चार्टसाठी👇👇👇


Saturday, February 24, 2024

मराठी भाषा गौरव दिन

श्रेष्ठ कवी कुसुमाग्रज यांची जयंती -27 फेब्रुवारी "मराठी भाषा गौरव दिन"


२७ फेब्रुवारी 'मराठी भाषा गौरव दिन'साजरा केला जातो.ज्ञानपीठ विजेते प्रसिद्ध कवी विष्णू वामन शिरवाडकर तथा कुसुमाग्रज यांचा आज
  •  (२७फेब्रुवारी) जन्मदिवस.या निमित्तानं जगभरात २७
  •  फेब्रुवारी रोजी 'मराठी भाषा गौरव दिन' (Marathi
  •  Bhasha Gaurav Din) साजरा केला
  •  जातो.महाराष्ट्र, गोव्यासह जिथं कुठं मराठी भाषिक
  •  आहेत,तिथं आज अनेक कार्यक्रम आयोजित केले
  •  जातात.या दिवशी मराठी भाषिक एकमेकांना शुभेच्छा
  •  देतात. 

मराठी भाषा गौरव दिन भाषण - 1

   सन्माननीय व्यासपीठ, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, उपस्थित गुरुजन वर्ग तसेच माझ्या मित्र आणि मैत्रिणींना माझा सप्रेम नमस्कार.! जगातील सर्व मराठी बोलणाऱ्या, मराठी भाषा जाणणाऱ्या माझ्या तमाम बंधू-भगिनींना मराठी राजभाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...

माझ्या मराठी मातीचा

लावा ललाटास टिळा..

हिच्या संगान जागल्या 

दऱ्याखोऱ्यातील शिळा...!!

   मराठी भाषा गौरव दिन हा दरवर्षी २७ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवशी साजरा करण्यात येतो. कुसुमाग्रज यांनी महाराष्ट्रच्या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान दिले असून मराठी भाषा ही ज्ञानभाषा होण्यासाठी अथक परिश्रम घेतले गेले आहेत. आपल्या मातृभाषेला गौरव म्हणून व कुसुमाग्रज यांच्या स्मृतींना अभिवादन म्हणून त्यांचा जन्मदिवस 'मराठी भाषा गौरव दिन' म्हणून साजरा करण्याचा शासनाच्या निर्णया नुसार कुसुमाग्रजांचा जन्मदिवस २७ फेब्रुवारी हा "मराठी भाषा गौरव दिन" म्हणून घोषित करण्यात आले. 

जय हिंद..जय मराठी..जय महाराष्ट्र..!!

     ❂~✧~●~●~●★●~●~●~✧~❂

मराठी भाषा गौरव दिन भाषण - 2

    आज मराठी भाषा गौरव दिन तेव्हा जगातील सर्व मराठी बोलणाऱ्या, मराठी भाषा जाणणाऱ्या माझ्या तमाम बंधू-भगिनींना मराठी राजभाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

    सन्माननीय व्यासपीठ आदरणीय गुरुजन आणि उपस्थित माझ्या सर्व मित्र-मैत्रिणींना आज 27 फेब्रुवारी मराठीतील प्रख्यात कवी नाटककार कादंबरीकार लेखक कुसुमाग्रज उर्फ विष्णू वामन शिरवाडकर यांचा जन्मदिवस.

    कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस दरवर्षी मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. दिनांक 27 फेब्रुवारी 1922 या दिवशी विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा जन्म महाराष्ट्राच्या भूमीत झाला. त्यांनी आपल्या असामान्य प्रतिभा आणि विलक्षण लेखन कौशल्य आणि शब्द सामर्थ्याच्या जोरावर मराठी भाषेतून साहित्याची निर्मिती केली.

   मराठी भाषा ही अमृतालाही पैजेणे जिंकणारी आहे. तिचा गोडवा अमृता पेक्षा अधिक आहे. मराठी भाषेला फार मोठी परंपरा लाभलेली आहे मराठी भाषा ही मराठी माणसाची लाडकी मायबोली भाषा आहे. देववाणी संस्कृत भाषा ही मराठी भाषेची महामाय म्हणून ओळखली जाते. 

     मराठी भाषा भारतामध्ये सर्वात जास्त बोलणाऱ्या भाषांपैकी तिसरी भाषा आहे भारतातील बावीस अधिकृत भाषांपैकी मराठी भाषा ही एक भाषा आहे महाराष्ट्र तसेच गोवा या दोन राज्याची मराठी ही अधिकृत राजभाषा आहे.

जय हिंद..जय मराठी..जय महाराष्ट्र..!!

     ❂~✧~●~●~●★●~●~●~✧~❂

मराठी भाषा गौरव दिन भाषण - 3

सन्माननीय व्यासपीठ आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख पाहुणे वंदनीय गुरुवर्य आणि माझ्या वर्ग मित्र आणि मैत्रिणींनो...

माय मराठी, साद मराठी.. 

भाषांचा भावार्थ मराठी..

बात मराठी सात मराठी..

जगण्याला या अर्थ मराठी...!

   महाराष्ट्रात दरवर्षी 27 फेब्रुवारी हा दिवस मराठी भाषा दिन किंवा मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. ज्ञानपीठ पुरस्कार विजेते मराठी कवी कुसुमाग्रज ( विष्णू वामन शिरवाडकर) यांचे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रातील योगदान मोठे आहे. या कार्याची आठवण म्हणून कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस असलेला 27 फेब्रुवारी हा दिवस  "मराठी भाषा गौरव दिन" म्हणून साजरा केला जातो. मराठी भाषा दिनाला जागतिक मराठी भाषा दिन असेही म्हणतात.

   अनेक कथा, कादंबऱ्या, निबंध, लघुकथा, नाटक, कविता इत्यादीं यांचे कुसुमाग्रजांनी कुशल असे लेखन केले. नटसम्राट सारखे अजरामर नाटक त्यांच्या असामान्य प्रतिभेची ओळख पटवून देते तर कुसुमाग्रजांचे विशाखा हे काव्यसंग्रह भारतातील  साहित्यातील  त्यांचे उत्कृष्ट कार्य व आधुनिक मराठी काव्याचे कायमची भूषण ठरले आहे.

     आपल्या पूर्वजांनी मराठी भाषेचा संपन्न वारसा आपल्याला दिला आहे त्याचे आपण जतन केले पाहिजे.

यासाठी आपण सर्वांनी मराठी भाषेतून शिक्षण घेतले पाहिजे मराठी लेखन वाचन केले पाहिजे तसेच मराठीतील ग्रंथ विकत घेऊन वाचले पाहिजे.

जय हिंद..जय मराठी..जय महाराष्ट्र..!!

     ❂~✧~●~●~●★●~●~●~✧~❂

मराठी भाषा गौरव दिन भाषण - 4
   सन्माननीय व्यासपीठ आदरणीय गुरुजन आणि उपस्थित माझ्या सर्व मित्र-मैत्रिणींना बंधू-भगिनींना मराठी राजभाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...!!
    आज 27 फेब्रुवारी मराठीतील प्रख्यात कवी नाटककार कादंबरीकार लेखक कुसुमाग्रज उर्फ विष्णू वामन शिरवाडकर यांचा जन्मदिवस.
  भारतात अधिकृत अशा 22 भाषा आहेत. या भाषांपैकी एक भाषा ही मराठी भाषा आहे. जगात सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषांमध्ये मराठी भाषेचे स्थान 15 वे आहे. मराठी ही प्रामुख्याने महाराष्ट्र आणि गोवा या दोन राज्यांमध्ये बोलली जाणारी भाषा आहे. मराठी भाषेला प्रदीर्घ साहित्यिक वारसा आणि परंपरा आहे. अशा या मोठी परंपरा असलेल्या मराठी भाषेचा गौरव 27 फेब्रुवारी रोजी मराठी भाषा दिन किंवा मराठी भाषा गौरव दिन साजरा करून केला जातो.

   मराठी भाषेला अधिक संपन्न बनवण्याकरिता अनेक संत कवी साहित्यिकांनी अर्थ कसे परिश्रम घेतले. मराठी भाषा ही अनेक संतांच्या किर्तन आणि भारुड,ओव्यांनी, भजनाने सजलेली आहे. ती अनेक मराठी साहित्यिकांच्या प्रतिभासंपन्न अशा लेखणीने समृद्ध संपन्न झालेली आहे.
  सावतामाळी, नरहरी सोनार, संत नामदेव, संत तुकाराम संत ज्ञानेश्वर, गोरोबा कुंभार या सारख्या संतांनी मराठी भाषेला जिवंत ठेवले.

    मराठी भाषा दिनानिमित्त महाराष्ट्रात अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्याची परंपरा आहे. मराठी भाषा जतन करण्यासाठी तसेच मराठी भाषेच्या संवर्धनासाठी विविध उपक्रमांची सुरुवात मराठी भाषा दिन या दिवशी करण्याची पद्धत आहे. 

जय हिंद..जय मराठी..जय महाराष्ट्र..!!

     ❂~✧~●~●~●★●~●~●~✧~❂

मराठी भाषा गौरव दिन भाषण - 5

   सन्माननीय व्यासपीठ आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख पाहुणे वंदनीय गुरुवर्य आणि माझ्या वर्ग मित्र आणि मैत्रिणींनो...

माझा शब्द, माझे विचार,

माझा श्वास, माझी स्फूर्ती,

माझ्या रक्तात मराठी,

मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...!!

   मराठी भाषेला ज्ञानपीठ मिळवून देणारे महान साहित्यिक कुसुमाग्रज यांना मानवतेचे कवी म्हटले आहे. या महान साहित्यिकाने मराठी भाषेच्या प्रतिष्ठेत जी भर घातली त्याचप्रमाणे त्यांच्या महाराष्ट्रातील सांस्कृतिक क्षेत्रातील योगदान व मराठी भाषा ज्ञानभाषा होण्यासाठी घेतलेल्या परिश्रमांमुळे त्यांना अभिवादन म्हणून 21 जानेवारी 2013 पासून शासन निर्णयानुसार 27 फेब्रुवारी हा दिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून घोषित करण्यात आला. मराठी सर्वांग सुंदर भाषा आहे. मराठी भाषा ही आपली मायबोली भाषा आहे. मराठी भाषेला फार मोठी परंपरा लाभलेली आहे. 

     दैनंदिन जीवनात तसेच आजच्या इंटरनेट युगात समाज माध्यमावर मोठ्याप्रमाणावर मराठीचा भाषेचा उपयोग करूया. मराठी भाषेच्या जास्तीत जास्त उपयोग करून संपूर्ण जगात मराठी भाषेचा झेंडा रोवून, मराठी भाषेला अजरामर बनवूया. एवढे बोलून मी माझ्या भाषणाला पूर्ण विराम देतो.

जय हिंद..जय मराठी..जय महाराष्ट्र..!!

      ❂~✧~●~●~●★●~●~●~✧~❂

 मराठी भाषा गौरव दिन भाषण - 6
   'मराठी' राजभाषा दिना'च्या मनःपूर्वक कोटी कोटी 'हार्दिक शुभेच्छा !' जय 'मराठी' !

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी,
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी...
धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी
एवढ्या जगात माय मानतो मराठी...!!

'अनंत अमुची ध्येयासक्ती अनंत अन्‌ आशा किनारा तुला पामराला' असे स्पष्टपणे सांगणारी अजरामर कविता लिहिणाऱ्या कविवर्य  वि.वा. शिरवाडकर हे कुसुमाग्रज या टोपणनावाने लेखन करत.
कुसुमाग्रज यांचा जन्म दिवस हा 'मराठी भाषा दिवस' म्हणून साजरा केला जातो. मराठी साहित्यातील काव्य, कथा, नाटक या सर्व प्रकारात वैपुल्याने भर घालणाऱ्या आणि आपला ठसा उमटविणाऱ्या कुसुमाग्रजांचे मराठी कवितेत एक अढळ स्थान आहे.
    कुसुमाग्रजांचे नाव घेताच डोळ्यापुढे उभा राहतो तो एक ओजस्वी क्रांतिकवी आणि कानी ऐकू येतो गगनभेदी जयघोष, ’गर्जा जयजयकार क्रांतीचा गर्जा जयजयकार’. कवी कुसुमाग्रज हे खऱ्या अर्थाने ’क्रांतिकवी’. वयाच्या अवघ्या विशीत कुसुमाग्रजांनी अनेक तेजस्वी क्रांतिकाव्ये लिहिली. 
      ❂~✧~●~●~●★●~●~●~✧~❂

Friday, February 23, 2024

STUDENT आधार नंबर अपडेटची सुविधा प्राप्त

 


 यु-डायस प्लस 2023-24 प्रणाली (sdms) मध्ये आधार क्रमांक नसलेल्या विद्यार्थ्यांची माहिती अद्ययावत करणेबाबत सूचना प्राप्त -

ज्या विद्यार्थ्यांचे आधार नंबर 9999 9999 9999 असे नोंदविलेले होते ते अद्ययावत करण्यासाठी सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. 


Udise plus Sdms लॉगीन


तरी अशा विद्यार्थ्यांची माहिती तात्काळ अद्ययावत करण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापकांना आपल्या स्तरावरून आदेशित करावे


✧════•❀❁•════✧•════✧

  

Wednesday, February 21, 2024

शिक्षणाविषयी आपले घोषवाक्य

 'माझी शाळा सुंदर शाळा' शिक्षणाविषयी आपले घोषवाक्य कमाल १० शब्दात :-

Text मध्ये नमूद करणे व स्व:हस्ताक्षरात लिहून, त्याचे छायाचित्र अपलोड करणेसाठी खालील घोषवाक्य वापरता येतील

⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️




📒गुणवत्तापूर्ण शिक्षण निपुण भारताचे लक्षण 


📗योग्य शिक्षण लोकांना इतर लोकांशी समानता आणि आपलेपणाची भावना देते.


📘एक चांगला नागरिक निर्माण करण्यासाठी शिक्षण आवश्यक आहे.


📙जीवन हा सर्वोत्तम शिक्षक आहे.


📗शिक्षण हे केवळ नवीन शिकण्यासाठीच नाही तर तुमचा स्वतःचा विकास करण्यासाठी आहे.


📒योग्य शिक्षण घेण्यासाठी वयाचे बंधन नसते.


📙तुम्ही शिक्षणाला तुमची आवड बनवा तुमचे स्वप्न पूर्ण होईल.


📓उद्याच्या चांगल्या आयुष्यासाठी आजच योग्य शिक्षण घ्या.


📔फक्त स्वप्न पाहू नका, ते सत्यात उतरवा; आणि शिक्षण हा ते करण्याचा मार्ग आहे.


📕शिक्षण तुम्हाला उद्याचे भविष्य घडवण्यास मदत करेल, यशस्वी मानव आणि जबाबदार नागरिक तयार करेल.


📒शिक्षण घेणे हा प्रत्येक मुलाचा हक्क आहे.


📗शिक्षण हा सर्व शक्तींपासून विजय आणि स्वातंत्र्याची गुरुकिल्ली आहे.


📘शिक्षण हा सतत शिकण्याचा मार्ग आहे.


📙शिक्षण हे वय, लिंग, जात, धर्म आणि प्रदेश या सर्व शक्तींपासून स्वतंत्र आहे.


📚शिक्षण हे शक्ती आहे आणि माणसाला प्रभावशाली बनवते.


📒शिक्षण रिकाम्या मनाची जागा सकारात्मक विचारांनी घेते.


📗शिक्षण माणसाला योग्य मार्गावर घेऊन जाते.


📒शिक्षण माणसाला सकारात्मक विचार करण्यास आणि चांगली कृती करण्यास प्रवृत्त करते.


📗लोकांना सुधारण्यासाठी शिक्षण हा सर्वोत्तम मार्ग आहे.


📘शिक्षण तुमचे आजचे वाईट उद्या चांगल्यामध्ये बदलते.


🗞शिक्षणामुळे समाज मिथक आणि निषिद्धांपासून मुक्त होतो.


📓शिक्षण माणसाला सामाजिक चिंतेतून बाहेर काढते.


📔शिक्षणामुळे अमर्याद शिकण्याची संधी मिळते.


📰सुख समृद्धीचा झरा; शिक्षण हाच मार्ग खरा.


📓पाठशाला असावी सुंदर; जेथे मुले मुली होती साक्षर.


📔मुलगा मुलगी एक समान; द्यावे त्यांना शिक्षण छान.


📒जबाबदार पालकाचे लक्षण; मुलांचे उत्तम शिक्षण.


📕शिक्षणाने मनुष्य साक्षर होतो व अनुभवाने तो शहाणा होतो.


📗एकाने एकास शिकवावे.देश साक्षर करावे. 


📘जो राहे निरक्षर, तो फसे निरंतर.


📒साक्षरतेचा दिवा, घरोघरी लावा.


📕गिरवू अक्षर, होऊ साक्षर.


📔शिक्षणात काट कसर नको. काटकसरीचे शिक्षण मात्र हवे.


📒स्वाभिमान जागृत करून सन्मानाने जगवतं ते शिक्षण.


📔मनुष्याच्या सहनशक्तीचा आविष्कार म्हणजे खरे शिक्षण.


📗विद्येने नम्रता आणि नम्रतेने विद्या शोभून दिसते.


📘विद्येविना मनुष्य पशू आहे.ज्यामुळे स्वाभिमान जागृत होतो ते खरे शिक्षण होय.


🗞विद्या ही संकटकाळी साथ देणारे शस्त्र आहे.


📁एक एक अक्षर शिकूया; ज्ञानाचा डोंगर चढूया .


🗂वाचाल तर वाचाल.


🗞साक्षरतेचा एकच मंत्र; शिक्षण देणे हेच तंत्र.


📒देणं समाजाचं फेडावं; काम शिक्षणाच करावं.


📓साक्षरतेचा एकच संदेश; अज्ञान संपून सुखी होईल देश.


📰एकाने शिकवूया एकाला; साक्षर करूया जनतेला.


📒देशाचा होईल विकास; घेवूनी साक्षरतेचा ध्यास.


📕होईल साक्षर जन सारा; हाच आमचा पहिला नारा.


📗ज्योतीने ज्योत पेटवा; साक्षरतेची मशाल जागवा.


📘आधी विद्यादान; मग कन्यादान.


📙राहू आपण एकोप्याने; देश घडवू शिक्षणाने.


📒माता होईल शिक्षित; तर कुटुंब राहील सुरक्षित.


📕नर असो व नारी; चढा शिक्षणाची पायरी.


📗अक्षर कळे संकट टळे.


📒शिक्षण हीच आयुष्याची खरी गुरुकिल्ली आहे.


🗂ज्ञानज्योत लावू घरोघरी, दूर करू निरक्षरता सारी.


📘सुखी जीवन जगण्याचा एकच नारा सुशिक्षित करूया समाज सारा.


📓आनंदी जीवन जगण्याचा एकच मंत्र, साक्षर होणे हा कानमंत्र.


📔शिक्षणाचा सर्वात प्राथमिक फायदा म्हणजे तो वैयक्तिक जीवन सुधारतो आणि समाज सुरळीत चालण्यास मदत करतो.


📘शिक्षण हे एक साधन आहे ज्याचा वापर तुम्ही तुमच्या दिवस चांगला करण्यासाठी वापरता.


📗योग्य शिक्षण लोकांना इतर लोकांशी समानता आणि आपलेपणाची भावना देते.


📕तुमच्यासाठी एक चांगला नागरिक निर्माण करण्यासाठी शिक्षण आवश्यक आहे.

Sunday, February 18, 2024

LFW ELIMINATION ROUND TEST

                      


  'Leap for Word'  ने आयोजित केलेल्या Word Power Championship Elimination Round ची टेस्ट माझ्या इ. ४ थी ब वर्गातील १३ विद्यार्थ्यांनी यशस्वीरीत्या सोडविल्याबद्दल LFW  कडून सहभागी प्रमाणपत्र मिळाले. त्याबद्दल सर्व विद्यार्थ्यांचे मन:पूर्वक अभिनंदन!! 👏👏🌹

      मुलांना इंग्रजी विषयासारख्या अवघड वाटणाय्रा विषयाच्या स्पर्धा परीक्षेची ओळख व्हावी व स्पर्धेतील आव्हाने सहजरित्या पेलता यावीत व जागतिक 🌎 दर्जेचा विद्यार्थी घडविण्यासाठी काही अंशी का होईना याची  मदत होईल या उद्देशाने आमच्या मुलांनी यात सहभाग नोंदवला आहे👍👍















Saturday, February 17, 2024

मा.मुख्यमंत्री संदेश पत्रासोबत सेल्फी


*🔸मा. मुख्यमंत्री संदेश पत्रासोबत सेल्फी📱📸 अपलोड करण्याची लिंक उपलब्ध🔸*

    महाराष्ट्र राज्यामध्ये "मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा" या उपक्रमातंर्गत शासकीय व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला आहे.

मा.मुख्यमंत्री महोदय यांनी विदयार्थ्यांना उद्देशून लिहिलेले संदेश पत्र हे सर्व शाळांमधील २ कोटी ११ लाख मुलांपर्यंत पोहचविण्यात आलेले आहे. 

👉 इथे क्लिक करा व सेल्फी अपलोड करा

          वरील लिंकवर क्लिक करून दि.१७/०२/२०२४ ते दि.२५/०२/२०२४ या कालावधीमध्ये अपलोड करावयाचे आहेत. त्याप्रमाणे सोबत जोडलेल्या फ्लोचार्टनुसार उपक्रमाची माहिती अपलोड करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. 

*खालील प्रत्येक बाबी पूर्णपणे, अचूक व स्पष्टपणे नमूद करावे.*👇👇

१) भ्रमणध्वनी क्रमांक.

२) कॅपच्या (Captcha) दिलेल्या जागेत व्यवस्थित टाकावा.

३) विद्यार्थ्यांचे संपूर्ण नाव.

४) आपल्या शाळेचे पूर्ण नाव.

५) दिलेल्या यादी मधून आपल्या शाळेचा जिल्हा व तालुका निवडावा.

६) शिक्षणाविषयी आपले घोषवाक्य कमाल १० शब्दात तयार करावे, Text मध्ये नमूद करावे व स्व:हस्ताक्षरात लिहावे, त्याचे छायाचित्र अपलोड करावे.

७) विदयार्थी, पालक व मा. मुख्यमंत्री महोदय यांच्या संदेश रूपी पत्रासमवेतचा सेल्फी अपलोड करावा.

८) मा. मुख्यमंत्री यांच्यासमवेत सहभोजन करीता प्रत्येक जिल्हयातून निवड करताना, सेल्फी व घोषवाक्य या दोन मुद्दयांवरून मूल्यांकन केले जाणार आहे.

९) माहिती भरून झाल्यावर संपूर्ण माहिती आवश्यकता असल्यास तपासावी व Submit बटणवर क्लिक करावे.






Wednesday, February 14, 2024

मराठी महिन्यातील सणांची नावे

 मराठी महिने व त्या महिन्यात येणारे सण व तिथी आणि हंगाम (सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त-शिष्यवृत्ती, MTS, NMMS, नवोदय व इतर स्पर्धा परीक्षा) 











महावाचन चळवळ

 




महावाचन चळवळ ,भविष्यवेधी वाचक वर्ग तयार करणारी चळवळ


📓📔📗📕💢💢💢📘📙📚📖

            *📌📜राज्य शासन, युनिसेफ आणि रीड इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने 'महावाचन चळवळ' हा उपक्रम राज्यभरातील सर्व माध्यम व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये राबविण्यात येत आहे.*
          *🔮📃आमच्या जि. प. प्रा. शाळा शेळगाव ता. सोनपेठ जि. परभणी शाळेतही सदर उपक्रम प्रत्येक शनिवारी राबवला जातो. मूळात 'महावाचन' हेच एक मोठे आव्हान विद्यार्थ्यांच्या समोर वाचनाची आवड निर्माण होण्याच्या दृष्टिकोनातून ठेवण्यात आले असावे?* 
     *🔷📄'मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा' अभियानांतर्गत 'महावाचन चळवळ' सुरू झाली.सुरू झालेल्या पहिल्या आठवड्यात विद्यार्थ्यांना वाचनासाठी ग्रंथालयातील प्रती विद्यार्थी एक पुस्तक देणेत आले व ५ पाने वाचन करण्याचे आव्हान देणेत आले.मुलांनी सुरूवातीला हवा तेवढा प्रतिसाद दिला नाही.*
           *🔶📑काही मुलांनी एक पेज, काही मुलांनी दोन पेज तर काहीनी फक्त चित्रच पाहून पुस्तके परत दिली. मग त्यात बदल करणे अभिप्रेत होते.आम्ही सर्वांनी (शिक्षक टिमने) मिळून त्यात बदल करायचे ठरविले . 
      *🔳🧾विद्यार्थ्यांना आपण पुस्तक न देता त्याच्या आवडीनुसार पुस्तक निवडण्याची संधी त्यांना द्यायची.मग काय आवडते पुस्तक म्हटल्यावर मुले आपले एक आवडते पुस्तक घेऊन वाचू लागले.वर्गानुसार वर्तुळाकार बसायचे व त्यातील किमान ५ पाने वाचायची.सुरूवातीला एवढेच आव्हान होते. मात्र त्यात बदल झाला.जो बदल आम्हाला अपेक्षित होता.*
          *⏩📰आव्हान न देताही मुलेच स्वत:ला आव्हान देतील व स्वत:च ती पूर्ण करतील. असा विचार आम्ही करायच्या आतच मुलांनी त्याची अंमलबजावणी केली सुध्दा.जिथे केवळ पुस्तकाची ५ पाने वाचणे अभिप्रेत होते. तेथे अख्ख पुस्तकच मुले वाचून काढू लागली. कारण ते त्यांच्या आवडीचे होते.*
          *➡️🗞आता आम्हाला याच्या पुढचा विचार करणे आवश्यक होते. परत आमच्या टिमने ठरवले आपण याला अणखीन एक आव्हान जोडू. मग काय ठरल्याप्रमाणे आव्हान दिले गेले.आव्हान होते, आपण जे पुस्तक वाचलात त्याबद्दल आपल्या स्वत:च्या शब्दात त्या पुस्तकाबद्दल प्रतिक्रिया द्यायची.मग ती प्रतिक्रिया तोंडी असो वा लेखी.मात्र सर्वांनी द्यायची.१-२ विद्यार्थ्यांची तोंडी प्रतिक्रिया घेतल्यानंतर लक्षात आले की, एवढी मोठी आपली पटसंख्या आहे. मग सर्वांची तोंडी प्रतिक्रिया घेणे शक्य नव्हते. मग त्यावर उपाय म्हणून लेखी प्रतिक्रिया मुलांकडून घ्यायचे ठरले. त्यामुळे वाचन व लेखन हे दोन्ही उद्दिष्टे (एकसाथ दोन आव्हाने) साध्य होणार म्हटल्यावर भारीच की.* 
       *⏭️📝त्यात इ.२ री ब ची विद्यार्थीनी 'कु.जान्हवी तळेकर' या विद्यार्थीनीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल स्व:अक्षरात लिहिलेली प्रतिक्रिया वाचली आणि आपल्यासमोर मांडावीशी वाटली. एवढ्या लहान वयात एवढी सुंदर प्रतिक्रिया वाचून भारीच वाटले... 🖋️🖊️*

Sunday, February 4, 2024

2023-24 चे संचमान्यता पोर्टल सुरू झाले....

 

*संच मान्यता 2023 - 2024* 

      संच मान्यता 2023-24 चे  working Teaching Staff व Non Teaching staff  ची माहिती भरणे सुरू झालेले आहे. 1 ऑक्टोबर 2023 ला कार्यरत असलेले Working Teaching Staff व Non Teaching Staff ची अचूक संख्यात्मक माहिती मुख्याध्यापक लॉगीन वरून संचमान्यता पोर्टलवर भरायची आहे. 

लिंकवर क्लिक करा👇👇

https://education.maharashtra.gov.in/sanch/users/login/7


विहीत मुदतीत संच मान्यता फॉरवर्ड करण्याची सर्वस्वी जबाबदारी शालेय मुख्याध्यापकांची असते. 


संच मान्यता फॉरवर्ड न केल्याने त्या शाळेची पदनिश्चिती होत नसते.